मोठी बातमी : गुलाबराव पाटील गुवाहाटीच्या रेडीसन हॉटेलमध्ये दाखल..
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२२ । राज्यच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे जवळपास ४० आमदार घेऊन बाहेर पडले आहे. एकनाथ शिंदे यांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरु असला तरी अद्याप ते समजून घेतील असे कोणतेही चित्र दिसत नाही. त्याच्यातच सकाळ पासून नॉट रिचेबल असणारे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे गुहाटीतील रेडिसन हॉटेल मध्ये पोहोचले आहेत.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या काही महिन्यांपासून नाराज असल्याचे वृत्त माध्यमातून झळकत होते. नगरविकास खात्यात आणि एकनाथ शिंदे यांच्या कामात होत असलेल्या ढवळाढवळला ते कंटाळले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील त्यांनी याबाबत बोलून दाखविले होते. पक्षप्रमुख मनावर घेत नसल्याने एकनाथ शिंदे यांनी ज्वलप्स ४० आमदार आणि मंत्र्यांचा मोठा गट फोडत पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या ३० पेक्षा अधिक आमदारांचा फोटो आणि व्हिडीओ आज सकाळी व्हायरल झाले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले काही मंत्री आणि आमदार देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याचे वृत्त सकाळपासून समोर येत होते. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील आता एकनाथ शिंदे यांच्या गोटात गेले आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे गुहाटीतील रेडिसन हॉटेल मध्ये पोहोचले आहेत.
शिवसेनेत सध्या उभी फूट पडली असून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे विरोधात उद्धव ठाकरे असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुमारे ४६ आमदार गुवाहाटी येथे दाखल झाले असल्याचे म्हटले जात आहे. शिंदे यांचे बंड मोडून काढण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरु होते. बंडखोरांना पुन्हा बोलाविण्यासाठी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभु यांनी एक पत्र शिवसेनेच्या सर्व आमदारांना पाठवलं होते. पत्रकात सर्व आमदारांना ५ वाजेपर्यंत मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी ट्विट करीत शिवसेना प्रतोदांनी काढलेला व्हीप बेकायदेशीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील एक भावुक भाषण करत शिवसैनिकांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावर आता एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले होते. आता गुलाबराव पाटील देखील आता गुवाहाटीच्या रेडीसन हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत.