गुरूवार, जून 8, 2023

चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला, मुलाचा दुर्दैवी मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२३ । रात्री सघुशंकेसाठी घराबाहेर पडलेल्या चिमुकल्यावर बिबट्याट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत 12 वर्षिय मुलाचा मृत्यू झाला आहे.

जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील जाकमाथा येथील वाक वस्ती येथे रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संजीव बाशीराम झमरे असे मृत मुलाचे नाव आहे. ओतूरच्या जाकमाथा येथील वाक परीसरात पाडुरंग ताजणे यांच्या शेतात कांदे काढण्यासाठी मध्यप्रदेश येथील शेतमजूर राहण्यास आले होते. रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास संजीव लघवीसाठी झोपडीबाहेर पडला. तेवढ्या त्याच्यावर अचानक बिबट्याने झडप घातली.

संजीवर हल्ला करणाऱ्या बिबट्याने त्याला झोपडीपासून अडीचशे ते तिनशे फूट लांब फरफटत नेले. दरम्यान परीसरातील तरूणानी आरडा ओरड केल्याने बिबट्या पळून गेला. याबाबत राजेश वाघ यांनी ओतूर वनविभागाला माहिती दिली.