जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२२ । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचा एक मोठा गट असून यात जळगाव जिल्ह्यातील काही आमदार असल्याचे वृत्त कालपासून येत होते. अखेर आज एकनाथ शिंदेसोबत एकूण ३५ आमदार असून यात जळगाव जिल्ह्यातील तिघांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काल रात्री व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये एकनाथ शिंदे व बच्चू कडू यांच्यासह एकूण ३५ आमदार सोबत असल्याचे दिसून येत आहे. यात जळगाव जिल्ह्यातील तीन आमदार देखील दिसून येत आहे. यात पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील, पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील तसेच चोपड्याच्या आमदार लता सोनावणे दिसून येत आहेत.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकूण ३२ आमदार असून यात बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या एका आमदाराचा देखील यात समावेश आहे.
एकनाथ शिंदे
विश्वनाथ भोईर
राजकुमार पटेल
महेंद्र थोरवे
भारत गोगावले
महेंद्र दळवी
अनिल बाबर
महेश शिंदे
शहाजी पाटील
शंभुराज देसाई
बालाजी कल्याणकर
ज्ञानराज चौगुले
रमेश बोरणारे
तानाजी सावंत
संदिपान भुमरे
अब्दुल सत्तार
नितीन देशमुख
प्रकाश सुर्वे
किशोर पाटील
सुहास कांदे
संजय सिरसाट
प्रदीप जैस्वाल
संजय रायमुलकर
संजय गायकवाड
शांताराम मोरे
श्रीनिवास वनगा
प्रताप सरनाईक
प्रकाश आबिटकर
चिमणराव पाटील
नरेंद्र बोंडेकर
लता सोनावणे
यामिनी जाधव
बालाजी किनिकर
दरम्यान; जळगाव जिल्ह्यातील पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि शिवसेनेचे समर्थक अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मात्र शिवसेनेच्या सोबतच राहणार असल्याचे याआधीच स्पष्ट केले आहे.