आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये नव चैतन्याचा संचार
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२२ । आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त के.सी.ई. सोसायटी संचलित सी.बी.एस ई. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी योग्य प्रात्यक्षिक सादर केले.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने प्रज्वलन झाली. प्राचार्या सुषमा कंची यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात योग साधनेला किती महत्त्व आहे याविषयी माहिती सांगितली तसेच योगशास्त्राचा उगम व त्यातील उच्चतम पातळी कशी गाठता येईल यासाठी अष्टांग योगा बद्दलची माहिती दिली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देखील योगा बद्दलचे आपले विचार आपल्या भाषणाच्या द्वारे व्यक्त केले. योग प्रशिक्षकांनी देखिल विद्यार्थ्यांना विविध योगासनांची माहिती देऊन त्यांच्याकडून ते करून घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्कूलच्या प्राचार्या सुषमा कंची व उपप्राचार्य माधवीलता सिट्रा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.