महाराष्ट्रराजकारण

खडसेंचा मार्ग मोकळा : राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाथाभाऊंना 28 मतांचा कोटा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२२ । विधान परिषद निवडणुकीसाठी १० जागांसाठी होणारी चुर्शीची निवडणूक सुरु आहे. १० जागांसाठी ११ उमेदवार मैदानात असल्यामुळे राज्य सभेप्रमाणे ही निवडणूक देखील चुरशीची ठरत आहे. आमदार कोण होणार ? हे पाहणे उत्सुकतेचे असल्याने प्रत्येक मत महत्वाचे आहे. त्यात महाविकास आघाडी तसेच भाजपाचे आमदार क्रमाक्रमाने मतदान करत आहेत. यातच एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 28 मतांचा कोटा देण्यात आला आहे. यामुळे आता खडसेंचा आमदार बनण्याचा मार्ग मोकळा झाल्यात जमा झाला आहे. अशी चर्चा रंगू लागली आहे.

कागदावरील आकडेमोडीत सोपी वाटणारी ही निवडणूक प्रत्यक्षात मात्र अवघड अशीच आहे. या निवडणुकीत राष्ट्रावादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे का काँग्रेसचे भाई जगताप असे चित्र रंगवले जात आहे. कारण भाजपाकडून या दोन नेत्यांना लक्ष केले जाण्याची शक्यता अधिक आहे. खडसे हे फडणविसांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. यामुळे खडसेंना विधान परिषेत येण्यापासून कसे रोखता येईल? यासाठी भाजपाने ताकद लावली आहे. मात्र एकनाथराव खडसे यांना भाजपकडून लक्ष्य केले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस खडसे यांचा कोटा वाढवून देण्याची शक्यता वर्तवली जात असताना तेच झालेले दिसत असून आता खडसेंचा मार्ग मोकळा झाला आहे.

  दुपारी 2 वाजेपर्यंत एकूण 275 जणांचं मतदान झाल असून अद्याप दहा आमदारांचं मतदान बाकी आहे. विधानपरिषद निवडणुकीत सर्वांत मोठा मुद्दा गुप्त मतदानाचा आहे. गुप्त मतदानामुळे क्रॅास वोटिंग होण्याची दाट शक्यता आहे. अर्थात भाजपा व महाविकास आघाडी दोघांनाही याचा सारखाच धोका आहे. महाविकास आघाडी एकत्र दिसत असली तरी या तिन्ही पक्षात अंतर्गत मतभेद आहेत. राज्यसभा निवडणुकीत याचे परिणाम दिसून आले. हेच गणित आता भाजपाला लागू होते. भाजपाची मोठी डोकंदूखी एकनाथराव खडसेंची आहेत. त्यांना क्रॉस वोटिंग झाल्यास ते सहज निवडून येतील, याची भीती भाजपाला सतावत आहे.

Related Articles

Back to top button