जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२२ चोपडा तालुक्यात पावसाने चांगलीच दांडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.यामुळे धानोरा परिसरात जिरायती व बागायती कापुस लागवड फारच कमी झालिये. तर तालुक्यात पेरणीयोग्य क्षेत्र हे ६४ हजार आहे. यामुळे फक्त २० टक्केच पेरण्या ह्या झालेल्या आहेत. त्यात ज्यांनी पहील्या पावसात पेरणी केलेली आहे,त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. यामुळे शेतकरी जोरदार पाऊसाची आतुरतेने वाट पाहत आहे.
काही शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या पावसानंतर लागलिच बियाणे लागवड केली.त्यावर जोरादार पाऊस हा आलाच नाही.पेरणी केलेल्या बियाण्यांना अंकुर फुटून जमिनिवर दिसत आहे.त्यामुळे येत्या दोन तीन दिवसात जर पाऊस हा आलाच नाही तर त्यावर दुबार पेरणीचे संकंट ओढवले जाणार हे निश्चित आहे.यंदा हवामान विभागाने चांगला पाऊस पडणार असल्याचे भाकीत केले असले तरी मात्र गेल्या आठवडाभरापासुन पाऊस न पडल्याने शेतकरी अधिकच चिंतेत सापडला आहे.
दुबार पेरणीचे संकंट
परीसरातील शेतकऱ्यांनी आपापली पेरणी आटोपली.त्यानंतर मात्र पेरणी केलेल्या शेतजमीनिवर पाऊसच पडलेला दिसत नाही.जो सुरुवातीला पडला तो सुद्धा तालुक्याच्या काही भागातच वादळी पाऊस पडून नुकसान झाले. त्यानंतर तब्बल दहा ते बारा दिवसांपासुन पावसाने दगा दिल्याने आता ज्यांनी पेरणी पूर्ण केली त्यांची बियाणे पूर्णतः वाया जाण्याची भितीही यानिमित्ताने व्यक्त होऊ लागली आहे. जर येत्या दोन तीन दिवसात जर पाऊस नाही आला तर दुबार पेरणीचेही संकंट ओढवले जाणार असल्याचे चित्र आहे.
८० टक्के पेरणी बाकी……
तालुक्यात पडलेल्या पाऊसाने फक्त विसच टक्के पेरणी झालेली आहे. तरी अद्यापही ८० टक्के शेतकरी पाऊसाचे पाणी पडल्याशिवाय पेरणी करणार नाहीत.तरीही बळीराजा जोरादार पावसाची वाट आतुरतेने पाहत आहे
खते व बियाणांवर केलेला खर्च गेला वाया
शेतकऱ्यांनी पेरणी साठी खते व बियाण्यांवर केलेला खर्च वाया गेल्याने शेतकरी चे कंबरडे मोडले आहे यातच आता पावसाने दडी मारल्याने पेरणी झालेल्या पिकांची फुटलेले अंकुर पावसाअभावी कोमेजू लागले आहेत यातच जर दोन दिवसात पाऊस आला नाही तर शेतकरी ना दुबार पेरणी साठी लागणारे नवीन बियाणे खरेदीसाठी पैसा आणावा कोठून असा प्रश्न पडलेला आहे.