जळगावचा तरुण देणार फेसबूकला टक्कर, भारतीयांसाठी तयार केले स्वदेशी ॲप

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२२ । प्रत्येक व्यक्ती ही आयुष्यात मुख्यता आपल्या आवडीच्या गोष्टी करायला पसंद करते आणि त्यात जमेल त्या परीने मेहनत घेत असते. त्यामध्ये यशश्वी होण्यासाठी काही जणांना बराच कालावधी जातो तर काही जण अगदी कमी वेळात यशश्वी होत असतात. अशीच एका तरुणाची यशोगाथा समोर आलीय, तो तरुण आहे जळगाव जिल्ह्यातील चक्क त्याने फेसबुकला टक्कर देणारे देशी ॲप तयार केलेय. ‘ इंडिया बुक ‘ असे या ॲपचे नाव आहे. केवळ ३ दिवसातच १८ हजारांहून जास्त लोकांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे. अगदी कमी कालावधीत हे ॲप लोकांच्या पसंतीस उतरले असून या ॲपचे सर्वत्र कौतुकही केले जात आहे.

lakshmikant sonar jpg webp

जिल्ह्यातील अमळनेर येथील लक्ष्मीकांत सोनार या तरुणाने हे ॲप तयार केले आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सगळे जण फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि व्हॉट्सॲपसारख्या सोशल मीडियाचा वापर करत आहेत. परंतु हे सगळे विदेशी ॲप असल्याने आपणही देशी ॲप तयार करावे या उद्देशाने या तरुणाने हे ॲप विकसित केलेय.

अगदी फेसबूकसारखेच हे ॲप
या ॲपच्या माध्यमातुन चॅटिंग, लाईव्ह कॉल, शेअरिंगद्वारे तुम्ही तुमचे विचार व्यक्त करु शकता. या ॲपमध्ये १० हजारांपर्यंत मित्र जोडू शकता. नकारात्मक असणाऱ्या पोस्टवर रिपोर्ट करु शकता. त्यामुळे या पोस्ट आपोआप डिलीट होऊ शकतात. तांत्रिकदृष्ट्या हे ॲप सुरक्षित आहे. ॲप हॅक होणे किंवा या ॲपमधून कोणताही गैरवापर होऊ शकत नाही. विशेष म्हणजे हे ॲप मोबाईलमध्ये कमी जागा घेते. त्यामुळे हे ॲप सहज वापरता येऊ शकते.

ॲपवर वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध
यामध्ये मायक्रो ब्लॉगिंगच्या साह्याने तुम्ही वेगवेगळ्या विषयावर अधिक प्रभावीपणे व्यक्त होऊ शकता. तुम्ही तुमची जाहिरात करू शकता. त्याचबरोबर गेम्स, बिझनेस आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ यांसारख्या अनेक सुविधा याद्वारे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच देशी ॲप असल्याने हे ॲप अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे. हे ॲप तुम्हीदेखील प्ले स्टोअरमधुन डाउनलोड करु शकता.अवघ्या तीन दिवसांतच तब्बल १८ हजारहून अधिक जणांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now