जिल्ह्यात २५ जून ते १ जुलै दरम्यान कृषि संजिवनी माहिमेचे आयोजन

जून 18, 2022 11:27 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२२ । जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी २५ जून ते १ जुलै दरम्यान जळगाव शहरात कृषि संजिवनी मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी कळविले आहे.

krushisanjavni

कृषि संजिवनी मोहिमेची सांगता १ जुलै रोजी होणार आहे. २५ जून ते १ जुलै दरम्याच्या कालावधीत हा खरीप पिकांच्या दृष्टीने महत्वाचा असल्याने या कालावधीत या मोहिमेव्दारे कृषि विभागाचे अधिकारी, कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांनी शेतकऱ्यांच्या बांधापर्यत जावुन नविन तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करताना शेतकऱ्यांनी सदर तंत्रज्ञानाचा अवलंब करावा यासाठी प्रयत्न करणार आहे. संपुर्ण राज्यातून एकाच दिवशी एकाच मोहिमेची प्रचार प्रसिध्दी करण्यात यावी या करीता खालील नमुद केल्याप्रमाणे प्रत्येक दिवशीचे नियोजन करण्यात आले आहे.

या मोहिमे अंतर्गत गाव बैठका, शिवार भेटीचे व शेतीशाळांचे आयोजन करण्यात येणार असुन शेतकऱ्यासोबत गावात कृषि विषयक राबविलेल्या नाविन्यपुर्ण उपक्रमांना भेटी देण्यात येणार आहे. तसेच मोहिम कालावधीत दररोज ऑनलाईन चर्चासत्र, मार्गदर्शनपर व्याख्याने इत्यादी आयोजित करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यानी मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now