वाळूमाफियाकडून मंडळ अधिकाऱ्याला धमकी, ट्रॅक्टर पळविले

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२२ । वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर तहसील कार्यालयात नेत असताना ट्रॅक्टर मालकाने तलाठ्याला धक्काबुक्की करून ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत यावल पोलीसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

CRIME 31 jpg webp

यावल तालुक्यातील दोणगाव ते डांभूर्णी दरम्यानच्या रस्त्यावरून दि. १५ जून रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास ट्रॅक्टरद्वारे वाळूची चोरटी वाहतूक करत असताना ट्रॅक्टर क्र. (एमएच १९ बीजे ४५३८) तलाठी निलेश जानकीराम धांडे यांनी अडविले. वाळू वाहतूकीबाबत परवाना विचारला असता ट्रॅक्टर चालक गोलू खूशाल बाविस्कर रा. पुनगाव ता. चोपडा याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर तलाठी यांनी ट्रॅक्टर वाहन जप्त करून यावल तहसील कार्यालयात नेत असताना चिंचोली येथील हायस्कूल जवळ ट्रॅक्टर मालक सचिन राजेंद्र बाविस्कर हा दुचाकीने डबलसिट येवून ट्रक्टरवरून तलाठी निलेश धांडे यांना धक्काबुक्की करून खाली उतरविले आणि धमकी दिली. याप्रकरणी तलाठी निलेश धांडे यांच्या फिर्यादीवरून तीन जणांविरुद्व यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now