लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाडींवर काळाचा घाला : नीलगायला धडक देत रिक्षा चक्काचूर, १ ठार, चौघे जखमी

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२२ । जळगाव शहराजवळ असणाऱ्या टीव्ही टॉवर जवळ भीषण अपघातामध्ये पाच जण जखमी झाले असून एक जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव रिक्षाच्या आड नीलगाय आल्याने रिक्षा पलटी होऊन याठिकाणी चार जण जखमी झाले तर एक जणाचा जागीच मृत्यू झाला.

accident jpg webp

अधिक माहिती अशी की भुसावळ येथे लग्नकार्यासाठी गेलेल्या नसरीम शेख, शाबीर बागवान, मोहम्मद रमजान, सहील शेख , बबीता बडगुजर लग्नकार्य आटोपून जळगावच्या दिशेने पुन्हा येत होते. यावेळी तरसोद फाट्याजवळ असणाऱ्या दूरदर्शन टॉवर जवळ अचानक त्यांच्या भरधाव रिक्षे समोर नील गाय आली व त्यांच्या रिक्षाला धडकली. या धडकेमुळे रिक्षा दोन वेळा पलटी खात खाली पडली. यावेळी साबिर भगवान वय 40 यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. व नरिम शेख, मोहम्मद असलम जान, बबिता बडगुजर, साहिल बागवान हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. अपघात झाल्या झाल्या त्वरित स्थानिक नागरिकांनी त्यांना सिविल हॉस्पिटलकडे रवाना केले. सिविल हॉस्पिटल मध्ये पोस्ट डॉक्टरांनी साबिर बागवान यांना मृत घोषित केले. साबीर बागवान यांच्या पश्चात आई पत्नी व दोन मुली व एक मुलगा आहे.

रिक्षा चकनाचूर
नील गाडीला धडक मारताच रिक्षाने दोन वेळा पलटी मारली व या मुळे रिक्षेचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याचे पाहायला मिळाले. या भीषण अपघातात टीव्ही टॉवर जवळ भगवान यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

लग्नाहुन परतताना झाला अपघात
ही सर्व मंडळी भुसावळ येथे लग्नासाठी गेले होते लग्न झाल्यावर ते भुसावळ होऊन जळगावला रवाना झाले होते. जळगाव ला येत असताना दूर्दर्षण टॉवर जवळ त्यांचा हा भीषण अपघात झाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now