मा.सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या संचालक मंडळाच्या हिताचा- सचिव निलेश भोईटे

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२२ जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्या. या संस्थेचे म.को.ऑडिनेशन कमेटीची सभा संस्थेच्या कार्यालयात चेयरमन नानासाहेब गोकुळ पितांबर पाटील यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.या सभेत मुख्यत सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला संदर्भात चर्चा विनीमय करण्यात आले. तसेच सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा आपल्या संचालक मंडळाच्या हितासाठी कसा प्रकारे चांगला आहे. या विषयी संस्थेचे मानद सचिव निलेश रणजित भोईटे यांनी सभेसमोर मांडले. नुकत्याच जाहीर झालेल्या १२ वी च्या निकाला संदर्भात सर्व शाखांचा आढावा घेण्यात आला.

नूतन मराठा jpg webp

वरील सभा न होण्यासाठी विजय पाटील याने जिल्हा पेठ पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती. मात्र तरी ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेस संस्थेचे चेअरमन नानासो गोकुळ पाटील, मानद सचिव निलेश भोईटे, संचालक जयंत देशमुख, कर्मचारी संचालक महेंद्र भोईटे, सह सभेला जिल्यातील २५ मुख्याध्यापक प्राचार्य उपस्थितीत होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now