शासकीय रुग्णालयातून शिक्षकाची दुचाकी लंपास
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२२ । जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या पार्किंग झोन मधून शिक्षकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
अनिल पांडूरंग दांडगे (वय-४१) रा. फॉरेस्ट कॉलनी, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते शिक्षक म्हणून नोकरीला आहे. गुरूवार ९ जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास दुचाकी क्र. (एमएच१९ के ८९९९) ने जिल्हा शासकीय रूग्णालयात कामानिमित्त आले होते. दरम्यान, त्यांनी त्यांची १० हजार रूपये किंमतीची दुचाकी जिल्हा रूग्णालयातील गेट नंबर दोनमध्ये पार्किंग झोन मध्ये लावलेली होती. दुपारी २ वाजता काम आटोपून अनिल दांडगे हे दुचाकी जवळ आले असता त्यांनी दुचाकी दिसून आली नाही. त्यांनी पार्किंग झोनमध्ये दुचाकीचा सर्वत्र शोधाशोध केली परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. दोन दिवसानंतर शनिवारी ११ जून रोजी दुपारी साडेबारा वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजेश पदमर करीत आहे.