तरुणाची ५३ हजाराची ऑनलाईन फसवणूक, गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२२ । मोबाईल ॲप्लीकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन काढलेले कर्ज व व्याज देवूनही पुन्हा पैश्यांची मागणी, व तरूणाच्या नातेवाईकांना अश्लिल मॅसेज पाठवून ५३ हजार ५९३ रूपयांची फसवणूक केल्याची घटना जामनेर येथे घडली आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाइल धारकावर गुन्हा दाखल झाला आहे.

crime 2022 06 12T140119.620

जामनेर शहरातील २८ वर्षीय तरूण हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्याचे ऑनलाईन सेवा केंद्राचे दुकान असून त्यावर त्याचा उदरनिर्वाह सुरू आहे. २९ मार्च २०२२ ते ८ जून २०२२ दरम्यान तरूणाने कॅश ॲडव्हान्स नावाच्या मोबाईल ॲप्लीकेशनच्या माध्यमातून वेळोवेळी २ लाख २९ हजार ९४ रु,चे ऑनलाईन कर्ज घेतले. परंतू, सर्व्हीस चार्ज म्हणून ८८ हजार ८१० रूपये कापून घेतले व उर्वरित १ लाख ४० हजार २५४ रूपये खात्यात जमा झाले. समोरील अज्ञात मोबाईल धारकांनी सात दिवसाच्या आत पैश्यांची मागणी केली. त्यानुसार तरूणाने १ लाख ४० हजार २५४ रूपये आणि कर्जाच्या रकमेवरील व्याज ५३ हजार ५६४ रूपये असे एकुण १ लाख ९३ हजार ८१८ रूपये परत केले. दरम्यान अज्ञात व्यक्तींनी अजून पैशांची मागणी केली. पैसे दिले नाही तर तुझ्यासह तुझ्या कुटुंबियांची बदनामी करू अशी धमकी दिली. तसेच तरूणाच्या मोबाईलचा डाटा चोरून तरूणासह नातेवाईकांना अश्लिल मॅसेज पाठवून खंडणीची मागणी केली. या त्रासाला कंटाळून तरूणाने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शनिवार ११ जून रोजी दुपारी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now