जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२२ । महिलेचा बळजबरीने अमानुष अत्याचार करून, व्हिडीओ बनविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आहे. या प्रकरणी पिडीत महिलेच्या तक्रारीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पाचोरा तालुक्यातील एका गावात ४० वर्षीय महिला तिचा भाऊ व मुलासह वास्तव्याला आहे. दि. ५ जून रोजी रात्री ९ वाजता महिला घरी एकटी असताना संशयित आरोपी आबा अंबादास कोळी रा. घोसला ता. सोयगाव जि.औरंगाबाद हा दुचाकीवर येवून तुला तुझ्या बहिणीच्या घरी सोडतो असे सांगितले. याला नकार दिल्याने शिवीगाळ करून तुझ्या भावासह मुलाला मारून टाकण्याची धमकी देत तिला दुचाकीवर जबरी बसवून घेवून गेला. संशयित आरोपी हा त्यांच्या सोयगाव शिवरातील शेतातील झाडा खाली तोंडा कपडाचा बोळा कोंबून अत्याचार केला. एवढेच नाही तर अत्याचाराचा व्हिडीओ देखील बनविला. त्यानंतर मारहाण करून खिश्यातील भिलावा दगडाने फोडून त्याचे तेल नको त्या ठिकाणी लावून छळ केला. याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी आबा आंबादास कोळी याच्या विरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे करीत आहे.