राज्यसभा निवडणूक : जळगावच्या अरविंद देशमुखांचा झाला विजय ; वाचा नेमका काय आहे प्रकरण ?

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२२ ।  राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापलेलं असताना भाजप नेते गिरीश महाजन यांचे पीए अरविंद देशमुख यांनी भाजपचे तिनही उमेदवार विजयी होणारच असा दावा केला होता. इतकंच नाही तर त्यांनी सोशल मीडियावर ओपन चॅलेंज देत 1 लाखाची शर्त लावली होती. तीनही उमेदवार भाजपचेच निवडून येतील असा त्यांचा दावा होता आणि झालंही तसच यामुळे आज जळगाववात तरी राज्यसभेबाबद अरविंद देशमुख यांचा विजय झाला असं म्हटले जात आहे.

राज्यसभा निवडणूक जळगावच्या अरविंद देशमुखांचा झाला विजय jpg webp

राज्यसभा निवडणुकीची सुरस वाढीस लागली असतांना सायंकाळी आमदार गिरीश महाजन यांचे पीए अरविंद देशमुख यांनी सोशल मीडियातून एक खुले आव्हान जाहीर केले. यात त्यांनी राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे तिन्ही उमेदवार विजयी होतील असा दावा करतांना एक लाख रूपयांची पैज लावण्यास कोण तयार आहे ? असे आव्हान दिले होते. याला जळगाव येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राहूल पाटील यांनी उत्तर देऊन पैज स्वीकारली. यानंतर अनेक तासांपर्यंत राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी लांबल्याने अरविंद देशमुख यांची अनोखी पैंज ही चर्चेचा विषय ठरला होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया सेलचे जळगावातील पदाधिकारी राहुल पाटील यांनी अरविंद देशमुख यांचं आव्हान स्वीकारलं. मात्र राहुल पाटील पैज हरला. त्यामुळे राहुलने शनिवारी दुपारी एक लाख रुपयांचा धनादेश अरविंद देशमुख यांना देण्यासाठी गिरीश महाजनांच्या जी. एम. फाउंडेशन या कार्यालयात आणला होता. पण अरविंद देशमुख यांनी एका कार्यकर्त्याचा सन्मान म्हणून एक लाख रुपयांचा धनादेश राहुल पाटलांना परत केला. अरविंद देशमुख आणि राहुल पाटील यांच्यातल्या पैजेची राज्यभर चर्चाही रंगली होती

आज पहाटे याचा निकाल लागला. यात भाजपचे पियुष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडीक या तिन्ही उमेदवारांचा विजयी झाले. भाजपचा तिसरा उमेदवार निवडून येण्याची शक्यता नसतांनाही हा चमत्कार घडला. अर्थात, यामुळे अरविंद देशमुख यांनी लावलेली पैज देखील ते जिंकले आहेत. यामुळे राज्यसभेतील या विजयाचा अरविंद देशमुख यांना एक लाख रूपयांचा विजय होणार आहे. खरं, तर यातून त्यांचा कॉन्फीडन्सचा जिंकला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

जितेंद्र आव्हाड यांनी जयत पाटील यांच्या हातात मतपत्रिका दिली. तर यशोमती ठाकूर यांनी मतपत्रिका एजंटला दाखवली. त्यांमुळे ही दोन्ही मतं बाद करावीत अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती. मात्र, पिठासीन अधिकाऱ्यांनी भाजपची ही मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा जीव भांड्यात पडला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी आधीच घोडेबाजाराचे आरोप होत होते. त्यातच राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक जेलमध्ये असल्याने त्यांना मतदानाला परवानगी देण्यास कोर्टाने नकार दिला. त्यामुळे एका एका मतासाठी भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं आज पाहायला मिळालं. त्यानंतर काँग्रेसचे आमदार अमर राजूरकर यांनी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मतावर आक्षेप घेतला . सुधीर मुनगंटीवार यांनी आपली मतपत्रिका बावनकुळे आणि शेलारांकडे दिल्याचा आरोप अमर राजूरकर यांनी केला अखेर निकाल लागला आणि भाजपचे ३ तर महाविकास आघाडीचे ३ असे उमेदवार निवडून आले आणि भाजपा विजयी झाला. यामुळे भाजपमध्ये आनंदाची लाट आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now