राजकारण

आम्ही कर्जाचे खड्डे बुजवले तुम्ही रस्त्याचे तर बुजवा : आ. राजूमामा भोळे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२२ ।  जळगाव शहर मनपावर असणारे कर्ज भारतीय जनता पक्षाने कडून टाकले व मनपाला कर्जमुक्तकरत कर्जाचे खड्डे आम्ही बुजवले. मात्र सत्त्ताधारी शिवसेनेने आता साधे जळगाव शहरातील खड्डडे बुजवावेत अशी प्रतिक्रिया आमदार राजूमामा भोळे यांनी ‘जळगाव लाईव्ह’शी बोलताना दिली.

शहर महानगरपालिकेमध्ये अभूतपूर्व सत्तापालट करत शिवसेनेने भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना फोडले व स्वतःची सत्ता स्थापन केली. यामध्ये जळगाव शहराचा विकास होत नाही असा त्या फुटलेल्या नगरसेवकांचा दावा होता. मात्र वर्षभरानंतर तुम्हाला जळगाव शहरात विकास दिसतो का ? असा प्रश्न आमदारांना विचारला असता त्यांनी उत्तर दिले कि, जळगाव शहराचा विकास खऱ्या अर्थाने झाला तो भारतीय जनता पक्षाच्या काळातच. आम्ही जळगाव शहर मनपाचे कर्जाचे खड्डडे बुजवले मात्र आत्ता शिवसेनेने शहरातील खड्डे बुजवावेत. याच बरोबर आम्हाला विकासाचे राजकारण करायचे आहे. त्यासाठी आम्ही चर्चेला देखील तयार आहोत.

दुसरीकडे जळगाव शहरात इतके घाण पाणी येते आहे. जळगाव शहरातल्या पाण्याला वास येतोय. मात्र मी स्वतः दोनदा याबाबत आयुक्तांना निवेदन दिले तरी देखील आयुक्त याबाबत कोणतीही दखल घेत नाहीत असा आरोप देखील. आमदार भोळे यांनी केला. पुढे ते म्हणाले की जळगाव शहराच्या पाणी प्रश्नावर आमच्या नगरसेवकांनी महासभेत प्रश्न उपस्थित केले होते.

त्या आधी सकाळी राज्यसभा निवडणुकित भारतीय जनता पार्टीने ३ पैकी ३ जागावर विजयी मिळवले भाजपने रचलेले शर्यंत्र यशस्वी ठरले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, व प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, आ. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात पियुष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक यांची राज्यसभा निवडणुकीत दणदणीत विजयी झाले. भारतीय जनता पार्टीचे ३ खासदार निवडून आल्या बदल जळगाव शहरातील (बीजेपी) “वसंत स्मृती” कार्यालयात येथे फटाके फोडून पेढे वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आले

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष तथा आ. सुरेश (राजूमामा) भोळे व महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, गटनेता भगत बालानी, उज्वला बेंडाळे, प्रदेश उपाध्यक्ष महिला मोर्चा, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, नितीन इंगळे, जिल्हा पदाधिकारी सुभाष तात्या शौचे, अरविंद देशमुख, महेश चौधरी, ज्योतीताई निंबोरे, रेखाताई कुलकर्णी, बापू ठाकरे, प्रकाशजी पंडित, धिरज वर्मा, गणेश माळी, योगेश पाटील, वंदनाताई पाटील, मंडळ अध्यक्ष संजय लुल्ला, आघाडी पदाधिकारी दिप्तीताई चिरमाड़े, रेखाताई वर्मा, सरोज पाठक, ज्योती राजपूत, शोभा कुलकर्णी, छाया सारस्वत, ज्योती बर्गे, युवा मोर्चा पदाधिकारी भूषण भोळे, मिलिंद चौधरी, दिशांत दोशी, जितेंद्र चौथे, अक्षय जेजुरिकर, सागर पाटील आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Back to top button