⁠ 
रविवार, मे 19, 2024

राष्ट्रवादीने ओबीसी समाजाला न्याय दिला, जळगावात कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२२ । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधान परिषदेची उमेदवारी दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. सर्व कार्यकर्त्यांमध्ये एकूणच चांगले उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी एकनाथराव खडसेंना उमेदवारी देऊन त्यांनी जळगाव जिल्ह्यातील ओबीसी समाजाला न्याय दिला आहे. त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक लाडवांजरी यांनी दिली.

विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री जेष्ठ नेते एकनाथराव खडसेंना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा गेल्या आठवड्यापासून सुरू होत्या, अखेर गुरुवारी चर्चेला पूर्णविराम मिळाला. एकनाथराव खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जळगावात राष्ट्रवादी तर्फे फटाके फोडत पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

तसेच अशोक लाडवांजरी म्हणाले की, एकनाथराव खडसे हे गोपीनाथराव मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत होते. आता भारतीय जनता पार्टी पंकजा मुंडे यांच्यासोबत व इतर समाजावर अन्याय करते आहे. त्यामुळे आ. शरद पवार यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसेंना उमेदवारी देऊन भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना एक चपराक दिली आहे. याचा संपूर्ण महाराष्ट्राला फायदा होणार आहे. तसेच महाराष्ट्रात एक चांगल्या प्रकारचा मेसेज जाईल. असेही लाडवांजरी म्हणाले .