जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२२ । विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री जेष्ठ नेते एकनाथराव खडसेंना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा गेल्या आठवड्यापासून सुरू होत्या. गुरुवारी चर्चेला पूर्णविराम मिळाला असून खडसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज सकाळी ११ वाजता एकनाथराव खडसे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
राज्यसभा निवडणुकीसोबतच विधान परिषद निवडणुकीची देखील रणधुमाळी सुरू आहे. उद्या दि.१० रोजी राज्यसभेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून दि.२० रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. विधान परिषदेसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची नावे निश्चित केल्यानंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडूनही आपले पत्ते उघड करण्यात आले आहेत.
राष्ट्रवादीकडून विधानपरिषद उमेदवारीसाठी एकनाथराव खडसे आण रामराजे निंबाळकर याना उमेदवारी देण्यात आली आहे. आज सकाळी ११ वाजता दोन्ही नेते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
राज्यात एकीकडे राज्यसभा निवडणुकीवरून नाट्यमय घडामोडी घडत असताना, दुसरीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. राज्यात येत्या २० जून रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसेंचे पुनर्वसन होणार आहि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना संधी देणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसने खडसेंना दिलेला शब्द पाळला असून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.