जळगाव जिल्ह्याच्या पोरी हुशार : जिल्ह्यात ९५.४६ टक्के विद्यार्थी झाले उत्तीर्ण
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२२ । एचएससी अर्थात बारावीचा निकाला बुधवारी दुपारी ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातीळ ९५.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे निष्पन्न झाले. निकाल लागला असून परिक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. जिल्ह्यात ४८७८३ विद्यार्थ्यांनी १२विच्या सहभाग घेतला होता. ज्यात ४८५९१ विद्यार्त्यांनी परीक्षेत प्रत्यक्ष सहभाग घेतला. ज्यातून ४६ ३२० विदयार्थी पास झाले. यामुळे जिल्याचा निकाल ९५.४६ टक्के लागला. जळगाव जिल्ह्यात यंदा केवळ ४.५४ टक्के मुलंच पास झाली.
गेल्या ३ वर्षाची आकडेवारी
मार्च २०२१ मध्ये जिल्हातील ९९.६१ टक्के निकाल लागला होता.
मार्च २०२० मध्ये ८८.८७ टक्के निकाल लागला होता
मार्च २०१९ मध्ये ७४टक्के निकाल लागला होता
तालुका निहाय आकडे वारी
अमळनेर – २०१० मुलं १३६४ मुली
भुसावळ – २२७२ मुलं १७४३ मुली
बोदवड – २४९ मुलं ३६१ मुली
भडगाव – १३८४ मुलं ९७६ मुली
चाळीगाव- २५४१ मुलं १७५१मुली
चोपडा – १६६४ मुलं १४४० मुली
धरणगाव – ८९४ मुलं ५९९ मुली
एरंडोल – ७८४ मुलं ५८० मुली
जळगाव – ७७३ मुलं ५८४ मुली
जामनेर – १४७१ मुलं १३५८ मुली
मुक्ताईनगर – ८७० मुलं ६९४ मुली
पारोळा – १७११ मुलं ९९० मुली
पाचोरा – १७२७ मुलं १२९६ मुली
रावेर – १७३३ मुलं १३१८ मुली
यावल – १९८५ मुलं १३१० मुली
मनपा जळगाव – ३९३९ मुलं ३०७४ मुली
माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या उच्च माध्यमिक एचएससी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल दुपारी जाहीर करण्यात आला. आज दुपारी जाहीर करण्यात आलेल्या निकाल असून निकालानुसार, जळगाव जिल्ह्याचा ९५.५२ टक्के निकाल लागला आहे. जिल्ह्यातील शास्त्र विभागाचा निकाल सर्वोच्च लागला असून शास्त्र शाखेचा निकाल ९९.०७, वाणिज्य ९६.९३, कला ९२.२९ तर एमसीव्हीसी ९३.८० टक्के निकाल लागला निकालात मुलींनी नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा बाजी मारली आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे कळविण्यात आले आहे.