तरुणाला कारण नसताना लोखंडी पाईपाने बेदम मारहाण

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२२ । नशिराबाद येथे काही कारण नसताना तरूणाला लोखंडी पाईपाने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलीसांत चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

crime 2022 06 08T162514.669

नशिराबाद गावातील भवानी नगर हनुमान मंदीराजवळ रोहित अनिल रंधे (वय २०) हा तरूण आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. दि. ६ जून रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास काही एक कारण नसताना गल्लीत राहणारे शंकर प्रल्हाद जोहरे, प्रल्हाद जोहरे, जिजाबाई प्रल्हाद जोहरे आणि लक्ष्मी प्रल्हाद जोहरे यांनी रोहित रंधे याला लोखंडी पाईपाने बेदम मारहाण करून जखमी केले होते. आणि शिवीगाळ, धमकी दिली.

या प्रकरणी दि. ७ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास रोहित रंधे यांच्या फिर्यादीवरून शंकर प्रल्हाद जोहरे, प्रल्हाद जोहरे, जिजाबाई प्रल्हाद जोहरे आणि लक्ष्मी प्रल्हाद जोहरे सर्व रा. भवानी नगर, नशिराबाद यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मोहम्मद नूर खान पठाण करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now