जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२२ । राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज बुधवारी दुपारी १ वाजता ऑनलाइन स्वरूपात जाहीर होणार आहे. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर केला जाईल. दरम्यान, आज निकाल लागणार असल्यानं विद्यार्थी आणि पालकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा निकाल कुठं आणि कसा पाहायचा हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. Maharashtra HSC Result 2022
कसा पाहाल निकाल?
आज दुपारी एक वाजल्यानंतर mahresult.nic.in, hscresult.mkcl.org; hsc.mahresults.org.in, mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर केला जाणार असून संकेतस्थळावर गेल्यावर होम पेजवर इयत्ता १२ वी निकाल २०२२ ही लिंक पहावी. क्लिक केल्यावर नवे पेज उघडेल. तुमचा नोंदणी क्रमांक आणि जन्मदिनांक टाकून सबमिट केल्यावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल. यावर्षी 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.
कसा चेक कराल आपला निकाल
स्टेप 1 – mahresult.nic.in वर लॉन ऑन करा
स्टेप 2- बारावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा
स्टेप 3- तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका
स्टेप 4- तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा
स्टेप 5- एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल
स्टेप 6- निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा
बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांची संख्या
बारावी बोर्डाच्या परीक्षा 4 मार्चपासून सुरु झाल्या आणि 7 एप्रिल रोजी संपल्या होत्या. तर राज्यातील 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.
दहावीचा निकालही लवकरच
दरम्यान, महाराष्ट्र बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल कोणत्या दिवशी जाहीर होणार, विद्यार्थी आणि पालकांमध्ये याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अशातच देशातील इतर राज्यांतील दहावी, बारावीचे निकाल मात्र जाहीर करण्यात आले आहेत. अशातच, आज बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे लवकरच दहावीच्या निकालाची तारीखही जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.