सांगवीत २७ वर्षीय युवकाने घेतला गळफास

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जून २०२२ । पारोळा तालुक्यातील सांगवी येथे २७ वर्षीय तरुणाने ६ रोजी सायंकाळी ५ वाजता आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.

suiccide 1 jpg webp

माजी पंचायत समिती सभापती कै.दगडू पाटील यांचा मुलगा पंकज दगडू पाटील हा काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत होता. त्यामुळे त्याला नैराश्य आले होते. ६ रोजी त्याची आई शेतात गेल्याने तो घरात एकटा होता. त्यावेळी त्याने घरातच गळफास घेतला. या बाबत सायंकाळी ५ वाजता शेजारील नागरिकांना ही घटना समजली. याबाबत उशिरापर्यंत पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली नव्हती. या घटनेमागील इतर कारणांचा पोलिस शोध घेत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now