⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | अमोल शिंदेंचा पाठपुरावा : अखेर नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा…;

अमोल शिंदेंचा पाठपुरावा : अखेर नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा…;

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२२ । पिकविमा योजना खरीप हंगाम २०२१ अंतर्गत पात्र विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत असून शिंदे यांचा प्रयत्नांना यश आले आहे. दरम्यान शेतकऱ्यांना मध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाचे वातावरण असून शेतकऱ्यांनी खा. उन्मेष पाटील व अमोल शिंदे यांचे आभार व्यक्त केले.

पाचोरा व भडगाव तालुक्यातील पात्र एकूण ७७१ शेतकऱ्यांना रक्कम रुपये ८५ लाख २८ हजार २९८ तसेच वैयक्तिक नुकसान व सॅम्पल सर्वेनुसार झालेल्या नुकसानी करिता पाचोरा व भडगाव तालुक्यातील ४४६० शेतकऱ्यांना रक्कम रुपये ०१ कोटी ७८ लाख ५० हजार ४२८ रुपये आज पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली आहेत. परंतु उर्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम म्हणजेच सॅम्पल उत्पन्नावर निश्चित झालेले नुकसान भरपाई ची रक्कम सदरील विमा कंपनी कडून शेतकऱ्यांना मिळालेली नव्हती. तसेच सदर नुकसानीची रक्कम निश्चित करताना आवश्यक असलेले पीक कापणी प्रयोगाचे संकलन देखील जिल्ह्यात पूर्ण झाले होते. तरी ही रक्कम तात्काळ मिळावी याकरिता भाजपाच्या अमोल शिंदे यांनी दि.२१ मार्च २०२२ रोजी जिल्हा कृषी अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन खा.उन्मेष पाटील यांच्या माध्यमातून सततचा पाठपुरावा व अधिकाऱ्यांसह विमा कंपनीशी वेळोवेळी संपर्क साधून मदत तात्काळ कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल यासाठी प्रयत्न केले होते. यात उडीद,मूग,सोयाबीन व त्यानंतर कापूस,मका,बाजरी या अनुक्रमे पिकांची नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. येणाऱ्या दहा दिवसांच्या आत सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होईल व त्यात काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे अमोल शिंदे यांनी सांगितले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह