जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जून २०२२ । पाचोरा – भडगाव तालुक्यात २८ कोटींच्या ५४ सिमेंट काँक्रेट बंधाऱ्यांना मंजुरी मिळाली आहे. यासाठी आ.किशोर पाटील यांनी सतत पाठपुरा केला, अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. दरम्यान, यामुळे सिंचन क्षमतेत वाढ होणार असल्याने शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.
या मध्ये कासमपुरा,टाकळी,भोरटेक खु,बांबरुड (महादेवाचे),सारोळा,निंभोरी,नालबंदी, बाळद बु,पिंपळगाव हरे,म्हसास,सावखेडा खु,वरसाडे (पिंपळगाव),वाडी,बांबरुड खु.महादेवाचे,लोहरी खु,खडकदेवळा,शेवाळे,वाडी शेवाळे,नाचणखेडा,आसनखेडा,तारखेडा,लासगाव,बांबरुड राणीचे,गाळण खु,कोळगाव,पथराड,वडजी,खाजोळा,वाघुलखेडा,सारोळा या गावांचा समावेश आहे.
पाचोरा शहरासाठी 5 कोटी
पाचोरा शहरातील विविध प्रभाग विकसित करण्यासाठी ५ कोटींची मंजुरी देण्यात आली आहे. त्यात खुली जागा विकसित करणे, कब्रस्तान विकसित करणे, विद्यालय शेजारील खुली जागा विकसित करणे.
कामांना लवकरच सुरवात!
महाराष्ट्र शासन विभागातून हा निधी मंजूर झाला असून लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती आ.किशोर पाटील यांनी ‘शिवालय’ कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. तसेच पाचोरा मतदार संघातील शेती, सिंचन, दळणवळण, व्यापार, उद्योग हे आपले प्राधान्याचे विषय असून त्यादृष्टीने मार्गक्रमण सुरू असून शेवटच्या घटकांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आ. पाटील यांनी केले.