बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या चार जणांवर पोलिसांची धडक कारवाई

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२२ । शहरातील एमआयडीसी परिसरात बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या चार जणांवर एमआयडीसी पोलीसांनी धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत देशी दारू व गावठी हातभट्टीची दारू हस्तगत केली आहे. चौघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 19 jpg webp

याबाबत अधिक माहिती अशी की, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवार २ जून रोजी सकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्याच हद्दीत अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यावंर विशेष मोहिम राबविण्यात आली. पोलीसांनी राबविलेल्या मोहिमेत संशयित आरोपी अशोक तुकाराम कोळी रा. रामेश्वर कॉलनी जळगाव, करण दारासिंग बागडे रा. सुप्रीम कॉलनी जळगाव, दत्तू पुना पाटील रा. म्हाडा कॉलनी आणि अमोल प्रमोद पाटील रा. खेडी ता.जि.जळगाव हे चौघे वेगवेगळ्या भागात अवैधरित्या देशी दारू आणि गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याचे आढळून आले आहे. या कारवाईत २ हजार ४६० रूपयांची देशी दारू आणि १ हजार ५०० रूपयांची गावठी दारू जप्त करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now