सेनेच्या दिपाली सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल करा : भाजपा महिला आघाडीची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२२ । शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दि. २६ मे रोजी व्हिडिओद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अर्वाच्च शब्दात वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे देशाच्या पंतप्रधानांच्या प्रतिमेची, देशाची बदनामी होत आहे. तसेच भारताचे नागरिक म्हणून आमच्या भावना देखील दुखावल्या गेल्या. शिवाय दिपाली सय्यद यांनी केलेले वक्तव्य हे बदनामीकारक आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई यावी, तसेच दंडनीय गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी पाचोरा भाजपा महिला आघाडी तर्फे करण्यात आली असून याबाबत प्रांताधिकारी पाचोरा व पोलीस निरीक्षक पाचोरा यांना निवेदन देण्यात आले.

pachora 11

याप्रसंगी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष सौ साधना देशमुख शहराध्यक्ष ज्योती चौधरी,उषाताई पाटील, सुरेखा कोळी,कल्पना तडवी प्रिया कोळी,सखुबाई पाटील व आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now