⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | जळगाव जिल्हा | पारोळा | वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याच्या सौर पंपाचे नुकसान‎; पारोळा तालुक्यातील घटना

वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याच्या सौर पंपाचे नुकसान‎; पारोळा तालुक्यातील घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२२ । वादळी वाऱ्यामुळे‎ एका शेतकऱ्याच्या शेतातील साैर‎ पंपाचे नुकसान झाले आहे. ही घटना पारोळा‎ तालुक्यातील शेवगे येथे साेमवारी‎ दुपारी घडली. परिणामी हंगाम पूर्व कपाशी‎ लागवड सुरू असताना सौर पंपाचे‎ नुकसान झाल्याने या शेतकऱ्यापुढे‎ अनेक अडचणी निर्माण झाल्या‎ आहेत.‎

प्रब येथील शेतकरी गोकुळ‎ शंकर सरदार यांच्या शेतात‎ मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या‎ अंतर्गत सौर कृषी पंप बसवण्यात‎ आला आहे. दरम्यान, शेवगे‎ परिसरात साेमवारी दुपारी २‎ वाजेच्या सुमारे अचानक आलेल्या‎ वादळी वाऱ्यामुळे गाेकुळ सरदार‎ यांच्या शेतातील सौर पंपावरील‎ पॅनल उडून गेले आहेत. यामुळे‎ सरदार यांचे मोठे आर्थिक नुकसान‎ आहे. दरम्यान, हंगाम पूर्व कपाशी‎ लागवड सुरू असताना सौर पंपाचे‎ नुकसान झाल्याने या शेतकऱ्यापुढे‎ अनेक अडचणी निर्माण झाल्या‎ आहेत.‎

author avatar
टीम जळगाव लाईव्ह