भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या शारीरिक व्यंगावर टीका करणाऱ्या शिवसेनेच्या आमदाराचा जाहीर निषेध
जळगाव लाईव्ह न्युज | ३० मे २०२२ । शिवसेनेच्या बेताल आमदाराने आपल्या संस्कृत वृत्तीचे जाहीर प्रदर्शन व समर्थनही केले आहे.शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने सुरू असलेल्या जाहीर भाषणात पाचोरा येथील शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष व जेष्ठ नेते किरीट सोमय्या यांना “बोबडा” संबोधून त्यांच्या शारीरिक व्यंगावर जाहीर टीका केली आहे. एवढ्यावरच न थांबता सत्ताधुंद बेताल आमदाराने नंतर पत्रकारांना खुलासा करताना आपल्या असंस्कृत प्रवृत्तीचे जाहीर समर्थन करून “होय मी बोबडा बोललो”असे निर्लज्जपणाने कबूल केलेले आहे.असे भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी बोलतांना सांगितले तसेच भाजपाचे जेष्ठ नेते किरीट सोमय्या यांच्या शारीरिक व्यंगावर टीका करणाऱ्या पाचोरा येथील उथळ प्रवृत्तीच्या व बेगडी प्रसिद्धीचा हव्यास असणाऱ्या आमदाराचा भारतीय जनता पार्टी पाचोरा-भडगाव तर्फे जाहीर निषेध करीत आहोत.
वास्तविक भारतीय लोकशाहीत सत्ताधारी व विरोधक यांच्यात राजकीय विषयांवर टीका-टिप्पणी व आरोप-प्रत्यारोप होत असतात. मात्र दिव्यांग, अपंग किंवा शारीरिक व्यंग यांच्यावर टीका टिप्पणी करणे निषेधार्य मानले गेले आहे.याच संदर्भात केतकी चितळे हीने शरद पवारांच्या शारीरिक व्यंगावर टीका केली तेव्हा आघाडीच्या सर्व चिल्लर व थिल्लर पक्षांनी अशा शारीरिक व्यंगावर टीका केल्याचे भांडवल करून केतकी चितळे वर आगपाखळ केली होती.मात्र आज त्यांच्याच सत्ताधारी आघाडीतील एका आमदाराने भाजपाचे जेष्ठ नेते किरीट सोमय्या यांच्या शारीरिक व्यंगावर टीका करून फुकट प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.यापूर्वीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील एका कार्यकर्त्याला स्वतःचा पाया पडायला लावणाऱ्या या शिवसेना आमदाराने फुकट प्रसिद्धी चा घाट घातला होता.आता पुन्हा एकदा आपल्या पक्षश्रेष्ठींच्या नजरेत मोठे होण्यासाठी त्यांनी हा बालिशपणा केलेला आहे. चमकोगिरी करणारा बेताल आमदार म्हणून यापूर्वी भारतीय जनता पार्टीने वारंवार त्यांच्या असंस्कृत व उथळ प्रवृत्तीचा निषेध केलेलाच आहे. परंतु ह्या वेळी थेट भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याच्या बोबडे पणावर बेताल वक्तव्य करून त्यांनी समाजातील शारीरिक व्यंग,दिव्यांग व्यक्तींचा अप्रत्यक्षपणे घोर अपमान केलेला आहे.अशा बेताल आमदाराने भाजपाचे जेष्ठ नेते किरीट सोमय्या व समाजातील तमाम दिव्यांग व शारीरिक व्यंग असलेल्या जनतेची जाहीर माफी मागावी अशी मागणी देखील भारतीय जनता पार्टी पाचोरा-भडगाव च्या वतीने अमोल शिंदे यांनी केली आहे.