जळगाव शहर

रक्तदानासाठी महिला असतात मागे.. हा समज अखेर खोडून काढला; रणरागिणींनी केले रक्तदान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२२ । उन्हाळ्यात सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा भासत असतो व त्यातही जिल्हा रुग्णालय जळगाव हे गोरगरीब जनतेचे आशास्थान, जिल्हाभरातून आलेल्या रुग्णांना इथल्या रक्तपेढीतून रक्त उपलब्ध न झाल्यास मोठा आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रास सोसावा लागतो. ही बाब लक्षात घेत राजा शिवछत्रपती परिवारातर्फे 29 मे रोजी रक्तदान शिबीर संपन्न झाले. याला जिल्हाभरातून प्रचंड प्रतिसाथ मिळाला असून तब्बल 44 रक्त पिशव्याचे रक्तदान करण्यात आले. यासाठी 7 रणरागिणी रक्तदानासाठी पुढे आल्या होत्या.

या शिबिराचे 6 जून रोजी राज्याभिषेक दिनी आयोजित करण्यात आले होते. परंतु, वैधकीय अधिकाऱ्यांनी रक्ताची कमतरता बासत असल्याचे राजा शिवछत्रपती परिवारास सांगिलते. त्यामुळे हे शिबीर ६रोजी न घेता २९ रोजी घेण्यात आले. त्यामुळे सर्वानी स्वेच्छेने रक्तदान करून महाराजांना अभिवादन केले 3 महिलांचे हिमोग्लोबिन कमतरते मुळे रक्त देता येत नव्हते, त्या स्वतःहून रक्तदानासाठी पुढे आल्या, तसेच रक्तदान करण्यासाठी महिला मागे असतात. हा समज खोडुन काढावा असे मनोगत ममता दीघडे, विजया पाटील, शीतल महाजन, मानसी चव्हाण यांनी व्यक्त केले व यापुढे पण आम्ही रक्तदान करू असे नमूद केले. या प्रसंगी अल्पोपहार व थँडपेय, चहा, भिस्कीट यांची व्यवस्था सचिन हटकर यांच्याकडून करण्यात आली होती. मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. मोहीम यशस्वी होण्यासाठी मावळे नरेंद्र इंगळे, संदीप बागुल, अनिल भगत, शुभम हडप, किरण पाटील, गौरव चौधरी, डॉ. दीपक पाटील, देवकर प्रभाकर पाटील यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button