⁠ 
बुधवार, नोव्हेंबर 27, 2024
Home | वाणिज्य | Gold Silver Rate : सोने-चांदीच्या किमती पुन्हा महागल्या, आज काय आहे प्रति ग्रॅमचा दर

Gold Silver Rate : सोने-चांदीच्या किमती पुन्हा महागल्या, आज काय आहे प्रति ग्रॅमचा दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२२ । आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे मागील दोन आठवड्यापासून सोन्याच्या (Gold Rate) भावात वाढ दिसून आलीय. सोबतच चांदीच्या (Silver Rate) भावात देखील वाढ झाली आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदी पुन्हा महागली आहे. जळगावच्या (Jalgaon) सुवर्ण नगरीमध्ये आज सोमवारी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या भावात किंचित ५० रुपयाची वाढ झाली आहे. तर चांदी ३३० रुपयांनी महागली आहे.

जळगावातील सोने-चांदीचा भाव?
आजच्या दरवाढीने जळगाव सराफ बाजारात सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५२,११० रुपयावर पोहोचला आहे. तर चांदीचा प्रति किलोचा दर ६३,५७० रुपयावर गेला आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीचे भाव सातत्याने वरखाली होत असल्याचे दिसून येताय. सध्या देशात लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. विवाह समारंभात दागिन्यांना मोठी मागणी असते. अशा दरम्यान देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदी दर पुन्हा वधारू लागले आहे. आठवड्यात सोने जवळपास ४०० ते ५०० रुपयाने महागले आहे. तर चांदी २०० ते ३०० रुपयांनी महागली आहे.

दरम्यान, सध्या दरवाढ होत असली तरी जागतिक पातळीवर मागील दोन महिन्यात सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण दिसून येतेय. रशिया-युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) दरम्यान मार्च २०२२ मध्ये सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५५ हजार ६०० रुपयांवर गेला होता. तो आता जवळपास ३४०० ते ३५०० रुपयांनी कमी झाला आहे. तर दुसरीकडे चांदी देखील ७३ हजारावर गेली होती. मात्र आता चांदीच्या किंमतीत जवळपास १० हजार रुपयाची घसरण झालेली दिसून येतेय.

गेल्या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
२३ मे २०२२- रुपये ५२,०२० प्रति १० ग्रॅम
२४ मे २०२२ – रुपये ४२,१०० प्रति १० ग्रॅम
२५ मे २०२२ – रु ५२,३६० प्रति १० ग्रॅम
२६ मे २०२२ – रु ५२,०१० प्रति १० ग्रॅम
२७ मे २०२२ – रु ५२,०६० प्रति १० ग्रॅम
२८ मे २०२२ – बाजार बंद

गेल्या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
२३ मे २०२२- रुपये ६२,८५० प्रति किलो
२४ मे २०२२ – रुपये ६२,७४० प्रति किलो
२५ मे २०२२- रुपये ६३,४३० प्रति किलो
२६ मे २०२२- रुपये ६२,९८० प्रति किलो
२७ मे २०२२- रुपये ६२,२४० प्रति किलो
२८ मे २०२२- बाजार बंद

शुद्धता कशी ओळखावी
सोने खरेदी करायला गेल्यास २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्यावर ९९९ लिहिलेले असेल. 23 कॅरेट सोन्यावर 995 आणि 22 कॅरेटवर 916 लिहिले आहे. 18 कॅरेटवर 750 लिहिले आहे तर 14 कॅरेटवर 585 लिहिले आहे. 999 शुद्धता असलेली चांदी सर्वात शुद्ध मानली जाते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.