⁠ 
मंगळवार, नोव्हेंबर 26, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | सावद्यात आदिवासी तडवी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यात 8 जोडपे विवाहबद्ध

सावद्यात आदिवासी तडवी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यात 8 जोडपे विवाहबद्ध

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२२ । सावदा येथील नगर पालिकेच्या प्रभाकर बुला महाजन सभागृहात आदिवासी सेवा मंडळ संस्थेतर्फे दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी तडवी समाज बांधवांचा सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजातील 8 जोडप्याचे विवाह संपन्न झाले. संस्थेचे हे सामुहिक विवाह सोहळ्याचे 25 वे रौप्य महोत्सवी वर्ष होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. शिरीष चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. चंद्रकांत पाटील हे होते.

आदिवासी तडवी समाज खूप मागासलेला समाज असून त्यास मुख्यप्रवाहात आणणे आवश्यक आहे. हे काम समाजातील शिक्षित व उच्च पदावर असलेल्या आपल्याच समाज बांधवांना करावे लागणार आहे. या समाज बांधवांनी आपल्या इतर समाज बांधवांना शिक्षित करून पुढे नेण्याची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी आमची मदत लागल्यास सदैव आपण तत्पर असणार असल्याचे प्रतिपादन आ. शिरीष चौधरी यांनी यावेळी अध्यक्षस्थनावरून बोलतांना केले.

तर आ. चंद्रकांत पाटील यांनी समाजाचे उन्नती साठी प्रगती साठी आपण केव्हाही आवाज द्या आपण हजर असल्याचे सांगितले, तसेच अश्या समाज उपयोगी कार्यक्रमाची नितांत आवश्यकता असल्याचे देखील सांगितले, तर सावदा येथील माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेश वानखेडे यांनी आपण या सामूहिक विवाह सोहळ्याचे 25 वर्षा पासून साक्षीदार आहोत प्रत्येक वेळी समाजाने जेव्हा आवाज दिला तेव्हा आपण साथ दिली असल्याचे सांगत यापुढे देखील समाज साठी प्रत्येक कार्यात समाज सोबत उभे राहू असे सांगितले आसेमचे अध्यक्ष राजू तडवी गुरुजी यांनी समजा साठी केलेले हे कार्य खरोखर उल्लेखनीय असल्याचे सांगत त्यांचा गौरव केला.

यावेळी कार्यक्रमास मुक्ताईनगर नगराध्यक्ष नजमा तडवी, माजी नगराध्यक्ष यावल नौशद तडवी, आसेम राज्य अध्यक्ष नजमा तडवी, आसेम जिल्हा अध्यक्ष अलिशान तडवी, सावदा येथील माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेश वानखेडे, माजी नगरसेवक फिरोज पठाण, रॉ. कॉ. रावेर तालुका कार्याध्यक्ष विलास ताठे रावेर, पत्रकार दिपक श्रावगे, आदिवासी प्रकल्प सेवा समिती सदस्य मासूम रेहमान तडवी, माजी सेल्स टॅक्स उपायुक्त नासीर तडवी, कामील शेठ, गनी तडवीसर, संजय जमादार,दिलरुबाब तडवी, लियाकत जमादार उपस्थित होते. सुत्रसंचालन राजू तडवी यांनी केले. यावेळी सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न लागलेल्या प्रत्येक जोडप्यास संसार उपयोगी साहित्याचे वाटप देखील मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह