जळगाव शहर

Accident : लोणवाडी’च्या’ शेतकऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२२ । वडिलांना घेण्यासाठी जळगावला येताना लोणवाडी बुद्रुक येथील शेतकऱ्याचा वराड ते जळके दरम्यान दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात डोक्यावर जबर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

संभाजी पाटील (वय ४६, रा. लोणवाडी बुद्रुक, ता.जळगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. संभाजी पाटील यांचे वडील मधुकर पाटील हे कामानिमित्त जळगाव शहरात आलेले होते. त्यांना लोणवाडी बुद्रुक येथे नेण्यासाठी संभाजी हे दुपारी दुचाकीने (क्रमांक एम.एच.१९ ए.झेड.५६८८) जळगावसाठी निघाले. वराड ते जळके रस्त्यावरील वळणावर त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. ऑक्सिलेटर वाढल्याने दुचाकी घसरून ते रस्त्यावर पडले. या अपघातात डोक्याला जबर मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रस्त्याने जाणाऱ्या वायरमन लोकांनी दुचाकीच्या क्रमांकासह अपघाताची माहिती लोणवाडी बुद्रुकच्या ग्रामस्थांना दिली. नातेवाइकांसह ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. तेथे नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. पाटील यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, तीन मुले, भाऊ, भावजय व पुतणे असा परिवार आहे.

Related Articles

Back to top button