बातम्या
किरकोळ कारणावरून वाद; चौघांची एकाला जबर मारहाण
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२२ । रस्त्याच्या कडेला लावलेली दुचाकी गुरांचा धक्का लागून गटारीत पडली. यामुळे गुराखी व दुचाकी धारकांचा वाद झाला. त्यात चौघांनी दुचाकी धारकाला जबर मारहाण केली. याप्रकरणी यावल पोलिसांत चौघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला.
यावल तालुक्यातील आडगाव येथील रमजान इमाम तडवी यांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी सकाळी ते गावातील एका दुकानावर नाश्ता करत होते. त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला लावली होती. तेथून काही गुरे जात होती. त्या गुराढोरांच्या धक्का लागून दुचाकी गटारीत पडली. याबाबत त्यांनी गुरे नेणाऱ्यास दुचाकी गटारीतून काढून देण्यास सांगितले. त्यावरून वाद झाला. या वादात अजय अयुब तडवी, सिराज रुबाब तडवी, साहील गोंडू तडवी (तिघे रा.कासारखेडा) आणि अरबाज गफूर तडवी (रा.जानोरी ता.रावेर) या चौघांनी रमजान तडवी याला मारहाण केली.