विज पडुन जिवीत हानी होऊ नये यासाठी ‘दामिनी’ ॲप डाउनलोड करा

damini

       जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२२ । मान्सुन कालावधीत विशेषत:जुन व जुलै या महिन्यात विज पडून जिवीत हानी होत असते. विज पडुन जिवीत हानी होऊ नये या साठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन पृथ्वी मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी “दामिनी” (Damini Aap)   ॲप तयार केले असुन सदरचे ॲप Google play Store  वर उपलब्ध आहे. या करीता सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून आपले अधिनस्त तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा, शासकीय अधिकारी / कर्मचारी, नागरिक, क्षेत्रीय अधिकारी / मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, महसुल सहाय्यक, गाव स्तरावरील सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्स सेवक, ग्रामपंचायत डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना सदरचे ॲप डाऊनलोड करुन त्याचा वापर करणेबाबत प्रवृत्त करण्यात यावे तसेच सदरचे ॲप GPS  लोकेशन ने काम करीत असून विज पडण्याच्या 15 मिनिटापुर्वी सदरच्या ॲपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते. या करिता आपले ॲप मध्ये आपले सभोवताली विज पडत असल्यास सदरचे ठिकाणापासून सुरक्षित स्थळी जावे तसेच सदर वेळी झाडाचा आश्रय घेऊ नये याबाबतचे त्यांना निर्देश देण्यात यावे.

तसेच इतर सामान्य नागरीक यांना हे ॲप डाऊनलोड करण्यास प्रवृत्त करावे, याबाबतच्य सूचना आपले स्तरावरुन निर्गमित करण्यात याव्यात. तसेच याबाबत आपले स्तरावरुन व्हिडीओ  कॉन्फरन्स आयोजित करुन दामिनी ॲप Google Play Store  वरुन डाऊनलोड करणे व वापरणे याबाबत माहिती द्यावी व त्याबाबतचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.

          गावातील सर्व स्थानिक शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना सदर App-Download  करुन त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या  Alert  नुसार आवश्यक पूर्वसूचना गावातील सर्व नागरिकांना देऊन होणारी  जीवितहानी टाळण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यास कळविण्यात यावे. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now