Accident : पिकअप व्हॅनची दुचाकीला धडक; 20 वर्षीय तरुण जागीच ठार

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२२ । शिरसोली ते वावडदा रस्त्यावर दुचाकीस्वाराला भरधाव चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघतात 20 वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

accident 19

रणजित संभाजी पानगडे (वय २०) असे मयत तरुणाचे नाव आहे. हा तरुण रा. इंदिरानगर, शिरसोली येथे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शिरसोली ते वावडदा रस्त्याने रणजित पानगडे हा दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव महिंद्रा पिकअप व्हॅन (एमएच १९ सीयु ४९६३) जोरदार धडक दिली. या धडकेत रणजीत पानगडे हा जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन तातडीने त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मदत घोषित केले.

मयत रणजित याच्या पश्चात आई, बहिण,काका असा परिवार आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now