जिल्ह्यातील त्या वाळू ठेकेदाराची जप्त अनामत परत द्या : महसूल राज्यमंत्री

valu mafia sand

जळगाव लाईव्ह न्युज | २५ मे २०२२ |  जिल्हा प्रशासनाने दिलेल्या कार्यरंभ आदेशातील अटी, शर्तींचा भंग केल्याप्रकरणी बांबरुड खुर्द येथील वाळू लिलावधारकाची ७ लाखांवर अनामत व बँक हमी जप्त केली होती. त्याबाबत औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार फेरचौकशीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश कायम ठेवले. त्या आदेशाविरुद्ध अपील केल्यानंतर अपर विभागीय आयुक्तांनीही अर्ज फेटाळला. त्या आदेशाविरुद्ध केलेल्या अपिलामध्ये महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जप्त केलेली रक्कम लिलावधारकाला परत करण्याचे आदेश दिले आहेत.


पाचोरा तालुक्यातील बांबरुड खुर्द येथील हा वाळू गट ३२ लाखांची सर्वोच्च बोली लावून भरत निवृत्ती देशमुख यांनी सन २०१५ मध्ये लिलावात घेतला होता. मात्र, अटी व शर्तींचा भंग केल्याने २८ मार्च २०१६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची ६ लाख ३७ हजार ६४० अनामत व बँक हमीचे ६४ हजार रुपये जप्तीचे आदेश दिले होते. त्या विरुध्द देशमुख यांनी औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती. त्याअनुषंगाने न्यायालयाने फेरचौकशीचे आदेश दिलेे. या आदेशानुसार २४ एप्रिल २०१७ रोजी जिल्हाधिकऱ्यांनी फेरचौकशी करुन त्यांचा आदेश कायम ठेवला. त्याविरूद्ध लिलावधारकाने अपर विभागीय आयुक्तांकडे ८ नोव्हेंबरला अपील केले. त्यांनी अपील फेटाळले. या आदेशाविरुध्द लिलावधारकाने महसूल राज्यमंत्र्यांकडे अपील अर्ज दाखल केला होता. त्यावर महसूल राज्यमंत्र्यांनी लिलावधारक यांना जप्त केलेली अनामत रक्कम व बँक हमी परत करण्याबाबत आदेश दिले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now