जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२१ । लॉकडाऊन लागल्यामुळे सराफ बाजारात शांतता आहे. अनेक कारागीर आपापल्या गावी गेल्याचे चित्र दिसून येत आहे. यातच सोन्याचे भाव देखील जैसे थे आहेत.
२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्राम ४,७०३ रुपये इतका असून १० ग्रामसाठी तुम्हाला जळगावात ४७ हजार ०३० रुपये मोजावे लागतील. मुंबई मध्ये हाच भाव प्रति ग्राम ४,५८६ रुपये इतका आहे. पुण्यात देखील तुम्हाला प्रति ग्राम सोने ४,७०३ रुपयांना मिळेल.
२२ कॅरेट सोन्याचा भाव जळगावात प्रति ग्राम ४,४७० रुपये इतका असून १० ग्रामचा भाव ४४ हजार ७०० रुपये इतका आहे. मुंबईत प्रति ग्राम ४,४८६ रुपये इतका भाव आहे. पुण्यात ४,४७९ रुपये तुम्हाला प्रति एक ग्रामसाठी मोजावे लागतील.
चांदीच्या भावात चांगलीच घट झाली असून प्रति किलो चांदीचा भाव ४,४०० रुपयांनी कमी झाला आहे. १ किलो चांदीचा दर ६७,६०० रुपये इतका असून प्रति ग्राम ६७.६ रुपये इतका आहे.