बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला विहिरीत

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२२ । यावल तालुक्यातील भालोद येथील ३५ वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना सोमवारी उघडकीस आली. सतीश रामकृष्ण इंगळे (वय ३५) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी फैजपूर पोलिसांत नोंद करण्यात आली.

death 87 jpg webp

इंगळे हा रविवारी सकाळी घरातून निघाला. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत घरी परतला नाही. सोमवारी सकाळी अट्रावल रस्त्यावरील पी.टी.चोपडे यांच्या शेतातील विहिरीत सतीशचा मृतदेह मजुरांना दिसला. यानंतर फैजपूर येथील सहायक फौजदार हेमंत सांगळे, महेश वंजारी, किरण चाटे हे घटनास्थळी आले. सिद्धार्थ भालेराव यांच्या मदतीने विहिरीतून मृतदेह काढत यावल ग्रामीण रुग्णालयात नेला. वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांनी शवविच्छेदन केले. सूरज इंगळे यांनी पोलिसांत खबर दिली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now