जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२२ । यावल तालुक्यातील दहिगाव येथील रहिवासी तथा शिवशंभु संघटना युवती जिल्हाध्यक्षा कविता ज्ञानेश्वर पाटील यांनी आईच्या पुण्यतिथीनिमित्त वृद्धाश्रमात अन्नदानाचा उपक्रम राबवला. आईच्या स्मृतीस अभिवादन करून त्यांनी आपल्या आईच्या नावाने “हिराई फाऊंडेशन” या नावाने नवीन सामाजिक कार्यास सुरुवात केली आहे.

आईच्या स्मृतीदिनी त्यांनी पुणे जिल्ह्यातील धायरी येथील सूर्योदय वृद्धाश्रमात अन्नदान केले. तेथे वृध्दाश्रमातील वृद्ध महिलांना स्वतः अन्नदान करून करीत आपल्या हाताने जेवण खाऊ घातले. पुर्ण दिवस आश्रमातील वृद्ध महिलांसोबत घालवला. या उपक्रमाप्रसंगी सूर्योदय वृद्धाश्रमच्या संस्थापिका छाया भगत, राधा लाटे यांची उपस्थिती होती. कविता पाटील यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.













