वंजारी फाट्यावर भीषण अपघात : ९ जखमी, २ गंबीर
जळगाव लाईव्ह न्यूज ।२२ मे २०२२ । एरंडोल तालुक्यातील वंजारी फाट्यावर भीषण अपघात झाला. दोन रिक्षांच्या झालेल्या अपघातामुळे दोन जण गंभीर जखमी तर नऊ जण जखमी झाल्याची घटना घडली
अधिक महिती अशी कि, पाराेळा शहरातील अमळनेर रस्त्यावरील बंजारी फाट्याच्या पुढे बालाजी कोटेक्स समोर एका आईस्क्रीमची रिक्षा व प्रवासी वाहतूक करणाऱ्या पॅजो रिक्षाची धडक झाली. या अपघातात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षातील संगीता हिंमत लोणारी (वय ३८, राहणार तुराटखेडा तुर्क), नरेंद्र सुरेश पाटील (वय १८, रत्नापिंप्री), आत्माराम तुकाराम भील (वय ५५), कलाबाई आत्माराम भील (वय ५०), रामसिंग शायसिंग भील (वय ५०), मंगला रामा भील (वय ४५, रा. दबापिंप्री), मच्छिंद्र चंद्रकांत भील (वय ३०, रा. वंजारी), मुजाईद मेहबूब शेख (वय २३, रा. दोंडाईचा), पॅजाे रिक्षा चालक मुकेश प्रकाश पवार (पातोंडा), लक्ष्मी हिंमत लोणारी (वय १३), योगिता हिंमत लोणारी (वय १५) हे जखमी झाले अाहेत. यातील संगीता लोणारी, कलाबाई भील या दोघांना गंभीर इजा झाल्याने त्यांना पुढील उपचारार्थ धुळे येथे हलवण्यात आले आहे.
जखमींवर डॉ. प्रशांत सोनवणे, डॉ. निखिल बोरा, भूषण पाटील, राजू वानखेडे, मंगलाबाई त्रिवेणी, परिचारिका पूनम सूर्यवंशी, शोभा बोरसे यांनी प्राथमिक उपचार केले. तर रत्नापिंप्री येथील उपसरपंच अंकुश भागवत यांनी सर्व जखमींना रुग्णालयात खाजगी व स्वतःच्या वाहनात दाखल केले हाेते. पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. या प्रकरणी रात्रीपर्यंत नाेंद झालेली नव्हती.