⁠ 

जळगावात पाच दिवसात सोन्याचे भाव २९०० रुपयांनी घसरले, आताचे भाव पहा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | 26 मे 2024 | सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीने नवीन विक्रम नावावर नोंदवला होता. जळगाव सुवर्णपेठेत सोन्याने 75 हजारांचा टप्पा ओलांडला होता. मात्र, आता किंमतीत मोठी घसरण आली आहे. गेल्या पाच दिवसात सोन्याचे भाव २९०० रुपयांनी घसरले आहे. दुसरीकडे चांदी दरात देखील मोठी घसरण झाली आहे.

जळगाव सराफ बाजार पेठेत ७०० रुपयांच्या वाढीसह सोन्याने २० मे रोजी ७५,१०० रुपयांची विक्रमी पातळी गाठली होती. मात्र, त्यानंतर २२ रोजीच्या १०० रुपयांच्या वाढीचा अपवाद वगळता सोन्याचे भाव कमी कमीच होत गेले आहेत. त्यात २१ मे रोजी ८०० रुपये, २३ मे रोजी तर ११०० रुपये, २४ मे रोजी ९०० रुपये आणि २५ रोजी २०० रुपयांनी सोन्याचे भाव उतरले आहेत. अशाप्रकारे गेल्या पाच दिवसांत सोन्याचे भाव २९०० रुपयांनी आवाक्यात आले आहेत.

सध्या सोन्याचा दर ७२,२०० रुपये प्रति १० ग्रॅम असे आहे. दुसरीकडे चांदी मात्र ९३ हजार ५०० रुपये प्रति किलोवर स्थिर आहे.शेअर बाजार उसळी घेत असल्याने तिकडे गुंतवणूक वाढत असल्याने सोन्याचे भाव कमी होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे. चार दिवसांपासून चांदी मात्र ९३ हजार ५०० रुपयांवर स्थिर आहे.