⁠ 
शनिवार, सप्टेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीला पळवले, ६ महिने अत्याचारातून मुलगी गर्भवती

लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीला पळवले, ६ महिने अत्याचारातून मुलगी गर्भवती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२२ । चाळीसगाव तालुक्यातुन एक संतापजनक बातमी समोर अली आहे. ती म्हणजे तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारातून ती गर्भवती झाली आहे. या प्रकरणी घटने प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी कि, चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून पळविले. संशयिताने तब्बल साडे सहा महिने अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवत अत्याचार केला. या प्रकारातून ती मुलगी गर्भवती झाल्याचा गंभीर प्रकार २१ मे रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीला आला आहे. चाळीसगाव तालुक्यातील चांभार्डी बु. (मजरे) येथील रहिवासी असलेला भगवान उर्फ भगा कैलास सोनवणे, असे संशयित आरोपीचे नाव आहे.

पिडीतेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपीविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात भादवी कलम- ३७६ (२) (एन), ३६३, ३६६ (ए), पोस्को अंतर्गत ४, ६, ८, १२ अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि धरमसिंग सुंदरडे हे करीत आहेत.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह