स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानला राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२२ । स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानला राज्यस्तरीय आदर्श सांस्कृतिक संस्था सेवारत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार समारंभ पुणे येथे श्री उद्यान कार्यालय सदाशिव पेठ येथे नुकताच संपन्न झाला.

award

मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या प्रतिथयश संस्थेच्या माध्यमातून या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले. पुरस्काराचे वितरण प्रकाश सावंत (महापरिषद समन्वयक), मनीषा कदम (पुरस्कार समारंभाध्यक्षा), अमोल सुपेकर (अध्यक्ष), एल.एस.दाते (कार्याध्यक्ष, पुरस्कार समिती), यांच्या उपस्थितीत व सुप्रसिद्ध कीर्तनकार व तत्वचिंतक ह.भ.प. श्यामसुंदर आळंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. प्रतिष्ठानच्या वतीने हा पुरस्कार कार्यकारी समिती सदस्य निनाद चांदोरकर यांनी स्वीकारला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now