⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

धक्कादायक! ३५ वर्षीय तरुणाचा पाय घसरून विहीरीत पडल्याने मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२२ । एका ३५ वर्षीय तरुणाचा शेतातील पाय घसरून विहीरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना २०मे रोजी पाचोरा तालुक्यातील आखतवाडे येथे घडली. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पाचोरा तालुक्यातील आखतवाडे येथील रविंद्र रामा गढरी‌ (वय ३५) हे दि. २०मे रोजी त्यांचे शेतात जात असताना अचानक त्यांचा पाय घसरून ते विहिरीत पडले. सदरचा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच रविंद्र गढरी यांना विहिरीतून बाहेर काढून तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी रविंद्र गढरी यांना मृत घोषित केले. घटने प्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अमोल पाटील हे करीत आहे. मयत रविंद्र गढरी यांचे पाश्चात्य आई, वडिल, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे.