जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२२ । एप्रिल-मे महिन्यातील ७.७९ टक्के महागाई दराने सर्वसाधारण लोकांचा बजेट कोलमडला आहे. आता त्यात मिर्ची पावडरने भर घातली आहे. कारण जी रची पावडर ही १८० रुपये किलोने मिळत होती. ती मिरची आज ३६० रुपयांना मिळत असल्याने आज मिरची पूडमध्ये दुपटीने वाढ झाली आहे.
गेल्या काही महिन्यात गहू, डाळ, पिठाप्रामणेच मिरची, जिरे, तेल, साबण, पेस्ट आदी वस्तूंच्या दरात २० रुपयांपासून ते १८० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे किचनचे बजेट कोसळले आहे. ती संतुलीत ठेवण्यासाठी गृहिणींना माेठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र समाेर येते आहे.
जानेवारी महिन्यात जी मिरची पावडर ही १८० रुपये किलोने मिळत होती. ती मिरची आज ३६० रुपयांना मिळत असल्याने आज मिरची पूडमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. जिरे जानेवारीत १८० रुपये किलोने मिळत होते. तर मे महिन्यात त्यात ९० रुपयांनी वाढ झाली. तसेच शेंगदाणे तेल, सोयाबीन व सनफ्लावर या तेलातही गेल्या चार महिन्यांत २० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसादने, धान्य, डाळींच्या दरात वाढ झाल्याने किचन बजेट काेलमडले.
जानेवारीत सर्वसाधारणपणे अंघोळीचा चार साबणाचा पॅक ११० रुपयांना मिळायचा. तो सध्या १३८ रुपयांना मिळत आहे. प्रति साबण आज ७ रुपयांची वाढ झाली आहे. टुथपेस्टचे भावही वाढले अाहेत. दुधाचा तुटवडा असल्याने श्रीखंड, पेढ्याचे भाव जानेवारीच्या तुलनेत वाढले. जानेवारीत ४४० रुपये किलोला मिळणारा पेढा आज ४६० रुपयांना मिळताे आहे. तर २५० रुपये किलोने मिळणारे श्रीखंड आज २८० ला मिळत आहे. सर्वच प्रकारचे धान्य, मसाले, गोडेतेल आदींच्या भावात जानेवारी महिन्याच्या तुलनेत २० ते ५० टक्क्यांपर्यंत भाववाढ झाली आहे. त्यामुळे गृहिणींनी गरजेनुसार मालाला महत्त्व देत तो खरेदी केला. त