
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२२ । जमात-ए-इस्लामी हिंद जळगाव व शनी पेठ पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी सात वाजता शनी पेठ पोलीस ठाण्याच्या आवारात जमात-ए-इस्लामी हिंद जळगावच्या वतीने शनी पेठ पोलीस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने विविध धर्मीयांसाठी ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये विविध धर्माचे प्रतिनिधी, सामाजिक व्यक्तिमत्व सहभागी झाले होते.

मौलाना अब्दुल अहद मिल्ली साहिब यांच्या पवित्र कुराण पठणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ज्याचा मराठी अनुवाद एजाज़ खान यांनी सादर केला. त्यानंतर जमात-ए-इस्लामी हिंद जळगावचे स्थानिक अमीर श्री. सोहेल अमीर शेख साहब यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, भारतातील सध्याची परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न वेगवेगळे लोक करत आहेत परंतु असे कार्यक्रम आयोजित केल्याने परस्पर बंधुभाव वाढतो. भारतातील जमात-ए-इस्लामी देशात शांतता आणि सुव्यवस्थेसाठी प्रयत्नशील आहे आणि एकमेकांना त्यांचे हक्क सांगण्याची पूर्ण संधी देत आहे.







