खळबळजनक : ‘ती’ बचावासाठी ओरडत असताना धमकी देत नराधमाकडून विहिरीजवळ तिच्यावर अत्याचार

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२२ । जळगाव जिल्हातील भडगाव तालुक्यात २७ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी भडगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरू भीमसिंग ऊर्फ जाड्या बारेला (वय २५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

rape jpg webp

धक्कादायक माहिती अशी कि , १२ मे २०२२ रोजी पीडित विवाहित महिला ही पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली असता निरू भीमसिंग ऊर्फ जड्या बारेला हादेखील विहिरीवर पाणी भरण्यासाठी आला होता. यावेळी त्याने पीडितेवर बलात्कार केला.

पीडिता आरोळ्या मारत असताना आरोपीने मारहाण करत ओरडू नको, नाहीतर तुझा गळा चिरीन असा दम भरला.

याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात निरू भीमसिंग ऊर्फ जाड्या बारेला (हल्ली रा. भडगाव, मूळ गाव झामटा, धवली, ता. सेंधवा, जि. बडवाणी, म.प्र.) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या अध्यक्षतेखाली स.पो.नि. चंद्रसेन पालकर करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now