⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | सावदा रेल्वे स्टेशन येथे रेल्वे डब्याचा कोविड सेंटर उभारावे

सावदा रेल्वे स्टेशन येथे रेल्वे डब्याचा कोविड सेंटर उभारावे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सावदा रेल्वे स्टेशन येथे रेल्वे डब्याचा कोविड आयसोलेशन / ऑक्सिजन सेंटर उभारावे अशी मागणी सावदा शहर शिवसेने तर्फे एक निवेदन खा. रक्षाताई खडसे यांना देऊन करण्यात आली आहे 

रावेर मुक्ताईनगर, यावल या तालुक्यात कोविड रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. दवाखान्यामध्ये रुग्णांना वेळेवरती बेड उपलब्ध नसतात.तसेच शासकीय कोविड सेंटर मधेही बेड उपलब्ध नाही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता झपाट्याने वाढत असलेली रुग्ण संख्या असल्याने आपण पुर्व तयारी म्हणून रेल्वे मार्फत सुरु असलेली रेल्वे डब्यांची कोविड सेंटर सावदा रेल्वे स्टेशन येथे सुरु करावे कारण सावदा रेल्वे स्टेशन हे चार तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून येथे रेल्वेचे रेल्वे डव्यांचे कोविड सेवा केंद्र करणे करणे  उचीत राहिल या स्टेशनवर गर्दी हि नसते व येथे माल धक्का असल्याने रेल्वे ये – जा करणाऱ्या गाड्यांना याचा त्रास होणार नाही.

तरी खासदार रक्षाताई यांनी या आमच्या मागणीचा व या मध्यवर्ती ठिकाणाचा विचार करुन सावदा रेल्वे स्टेशन येथे रेल्वेचे रेल्वे डब्यांचे कोविड सेंटर तत्काळ सुरु करावे अशी मागणी सदर निवेदनाव्दारे करण्यात आली असून यावर शिवसेना शहर प्रमुख भरत वसंत नेहेते, तालुका उप प्रमुख धनंजय वासुदेव चौधरी, माजी नगरसेवक शाम वसंत पाटील, शिवसेना रावेर क्षेत्र प्रमुख मिलींद सुरेश पाटील, संघटक  शरद गिरधर भारंबे यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

हे निवेदन खासदार रक्षा खडसे यांना ऑनलाईन पद्धतीने इमेल व ट्विटर द्वारे पाठवण्यात आले आहे. निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजपा महाराष्ट्र कार्यालय यांना पाठवण्यात आल्या आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.