जळगाव लाईव्ह न्यूज | १३ मे २०२२ | दिवसंदिवस वाढत्या महागाईचा फटका आता सर्वसामान्यांच्या टाटा पर्यंत येऊन पोहोचला आहे. कारण वाढत्या गव्हाच्या भावामुळे आणि चक्की च्या वाढत्या भावामुळे गव्हाचे पीठ हे गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा ते पंधरा टक्क्यांनी महाग झाले आहे.
पेट्रोल डिझेलचा खाद्यतेल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. याचा आता थेट परिणाम हा गव्हाच्या बालवाडीला झाला आहे. तेव्हापासून निर्मिती होणाऱ्या वस्तूंवर आता भाववाढीची टांगती तलवार उभी आहे.
ब्रेड , बिस्कीट तसेच केव्हा पासून निर्माण होणारे बेकरीची उत्पादन याच बरोबर आपल्या ताटातली चपाती आता महाग होणार आहे. ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे पण जीवनावश्यक वस्तू असल्यामुळे गव्हाच्या पाठीच्या मागणीला कुठलीही कमी नाहीये.
हॉटेल व्यावसायिकांना महागाईचा चटका बसला आहे. कोरोनापासुन व्यवसाय तोट्यात सुरू आहे. सध्या गव्हाच्या पिठात दरवाढ झाली आहे. गेल्यावर्षी गव्हाचे पीठ 32 रुपयाला मिळत होते तर ते आता 35 रुपयांवर पोहोचले आहे. यामुळे आता थाळी सिस्टीम वर व्यवसाय करणे हॉटेल व्यवसाय करण्यासाठी मोठे कष्टाचे काम म्हणून चुकले आहे.
प्रीतम पवार