आयुक्तांचा धडाका : जळगाव शहरातील नवीन रस्त्यांची केली तपासणी

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२२ । महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी शहरात सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामांची तपासणी सुरु केली असून बुधवारी त्यांनी स्वातंत्र्य चौकापासून पांडे डेअरी चौकापर्यंतच्या रस्त्याची तपासणी केली. तसेच कार्यादेशाप्रमाणे काम न झाल्यास हयगय केली जाणार नाही, अशी तंबी मनपाच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना दिली आहे.

डॉ. विद्या गायकवाड jpg webp

आयुक्त डॉ. गायकवाड बुधवारी १०.३० वाजता रस्त्यांच्या कामाची तपासणी करण्यासाठी जात असतांना त्यांना स्टेडीअम चौका समोर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया जवळील रस्त्यावरील खड्डा दिसून आल्याने त्यांनी त्याची माहिती घेतली. तसेच तातडीने पाईपलाईनच्या लिकेजची दुरुस्ती करण्याच्या सुचना दिल्या त्यानंतर स्वातंत्र्य चौक ते पांडे डेअरी चौक रस्त्याची पाहणी करुन बी.एम.च्या स्थिकनेसची तपासणी करुन मक्तेदार व मनपाच्या अधिकाऱ्यांना कार्यादेशातील स्पेसिफिकेशन प्रमाणे काम करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी शहर अभियंता विलास सोनवणी उपस्थित होते.

महापालिकेच्या नवीन आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्याकडून कामचुकारपणा करत बाहेर हिंडणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी अचानक कर्मचाऱ्यांचे हजेरीबुक मागविण्यात येत आहे. दिवसातून केव्हाही दोन वेळेस हजेरीबुक ताब्यात घेण्यात येत असून ड्युटीवर असताना गायब होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीसा बजाविण्यात येत आहेत. पहिल्याच दिवशी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी मनपाच्या प्रवेशद्वारावर बसून उशिरा येणाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली होती. त्यानंतर देखील अधून मधून अचानक हजेरी बुक मागविण्यात येत आहेत. त्यामुळे कामावर हजेरी लावून गायब होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर वचक निर्माण झाला आहे. असे असतांना बुधवारी डॉ. विद्या गायकवाड यांनी अचानक सकाळी ६ वाजता शामाप्रसाद मुखर्जी उद्यान, मलेरिया विभाग, पाणी पुरवठा युनिट व बांधकाम युनिटला भेट देवून तेथील कर्मचाऱ्यांची तपासणी केली.

नवीन आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी चांगलाच धडाका लावला असून कामात कसुरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी मलेरिया विभागातील तीन जणांचे निलंबन केले असून ४१ कर्मचाऱ्यांना शोकॉज नोटीस बजाविल्या होत्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now